Summary of the Book
संग्रहातल्या पुस्तकांची सतत वाढती संख्या संग्राह्काच्या मनावरचा ताण वाढवत असते. पुस्तकं ठेवण्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न तर असतोच; पण त्याशिवाय इतरही चिंता असतात. विशेषतः एका घरातून दुसऱ्या घरात स्थलांतर करताना पुस्तकं ही बाटलीतून बाहेर पडलेल्या जादूच्या राक्षसासारखी महाकाय भयावह रूप धारण करतात (ती कपाटात असतात तोवर आटोपशीर दिसतात). त्यामुळे आपल्या संग्रहात इतकी इतकी पुस्तकं आहेत असं म्हणण्यापेक्षा इतके इतके लेखक आहेत, हा विचार मनाला एक आभासमय का होईना, पण दिलासा देऊन जातो. शिवाय इतक्या लेखकांच्या सहवासात आपण वावरतोय ही भावनाच मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देते.