कवडसे पकडणारा कलावंत
चेखोव आणि त्याची कथा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 250 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
`कवडसे पकडणारा कलावंत’ हे मराठी साहित्यातील एक नावीन्यपूर्ण पुस्तक आहे. देशोदेशींच्या कथा व कथाकार हा पाडळकरांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे. श्री. पाडळकरांनी ह्या ग्रंथात श्रेष्ठ कथाकार अंतोन चेकॉव्हचे जीवन व त्याच्या कथा यांचे रसग्रहणपूर्वक विश्र्लेषण केले आहे.

चेकॉव्हच्या दोनशेहून अधिक कथांचा अभ्यास करून, तसेच त्याची चरित्रे, आठवणी, पत्रव्यवहार यांचा धांडोळा घेत पाडळकरांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे.

उणेपुरे 44 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चेकॉव्हच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटना व त्यांच्याशी समांतर, एक कथाकार म्हणून त्याचा होत गेलेला विकास याचे चित्रण करताना कलावंताच्या अंतरंगातील माणूस शोधण्याचा प्रयत्न पाडळकर तरल संवेदनशीलतेने व एकाग्र चिंतनाने करतात. पाडळकरांची निखळ जीवननिष्ठा त्यांना या अभिनव शोधात मूल्यविवेकापासून ढळू देत नाही. चेकॉव्हचे मोठेपण मान्य करूनही त्याच्या मनुष्यपणाला पडलेल्या चिरांकडे देखील पाडळकर तेवढ्याच साक्षेपाने वाचकांचे लक्ष वेधतात.

साहित्य अधिक मार्मिकतेने समजावे व जीवनातील अर्थगर्भतेचे आकलन व्हावे अशी धारणा असणार्‍या रसिकांना व अभ्यासकांना हे पुस्तक आश्र्वासक वाटेल.
Book Review
Write a review

Irshad Vadagaonkar
24/09/2022

काही पुस्तकात दरवर्षी वाचू वाटतात. आणि ते वाचत असताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच प्रतलावर जातो. फक्त सेल्फ प्रकारातील पुस्तके वाचूनच आपल्याला सेल्फ हेल्प होते असे नाही तर कधीकधी समीक्षेची पुस्तके वाचताना देखील हा अनुभव येऊ शकतो. कवडसे पकडणारा कलावंत हे देखील अशाच प्रकारचं एक पुस्तक. चेखवच्या कथांचे आणि त्याच्या जीवनाचे इतके सुंदर विश्लेषण कदाचितच दुसऱ्या कुठल्या लेखकाने केले असेल. रशियन भाषा विजय पाडळकर सरांना अवगत नसून देखील त्यांनी ज्या ताकतीने चेखव समजावुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो सर्वांनी वाचण्या जगण्यासारखे आहे. काही पुस्तके वाचताना आपल्याला आपलाच नव्याने शोध लागतो. आपण असे का आहोत किंवा आपल्या आजूबाजूची माणसे अशी का वागतात जशी ती वागतात. माणूस नावाचा प्राणी समजावुन घेण्याचा आणि तो मांडण्याचा प्रयत्न अनेक लेखक कलावंतांनी केला आहे. चेखव चे स्थान या यादीत बरेच वरचे येते. चेखव या यादीत का आहे आणि त्याचे जीवन आणि त्याची कथा एकमेकांत कशी विरघळलेली आहे हे विजय पाडगावकर आपणास उलगडून दाखवतात. आठवडाभर हे पुस्तक वाचत होतो, मनाचा अंधार या कवडशांनी थोडा का होईना उजाळून निघाला...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat