Summary of the Book
चित्रकला व शिल्पकलेमुळे प्राचीन काळापासून जग समृद्ध झाले आहे. अद्भुत चित्रनिर्मिती करणाऱ्या जगभरातील १५ चित्रकारांची ओळख बा. ग. पवार यांनी 'चित्रकारांचे चरित्र'मधून करून दिली आहे. पुस्तकाची सुरवात अर्थातच जागतीक कीर्तीचे भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या परिचयाने झाली आहे.
कुंचल्याबरोबरहच छिन्नी हातोडा हातात घेऊन एकापेक्षा एक सरस शिल्प घडविणारा मायकेल अंजलो, 'लास्ट सपर', 'मोनालीसा', अशा अजरामर चित्रकृतींचा निर्माता लिओनार्डो - द - व्हिन्स, 'हुकमी प्रतिभा मला लाभलेली आहे,' असे अभिमानाने सांगणारा रेम्बो व्हान ऱ्हाईन, लोकजीवनाचे वास्तव चित्रे, रेखाटणाराफ्रान्सिको - जोसे - द - गोया,
निसर्गचित्रांचा राजा जोसेफ, मेलॉर्ड टर्नर, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला व भूमिपुत्रांवर चित्रे रेखाटणारा फ्रेंच चित्रकार जेन फ्रेंकोमिलेट, नवकलेचा जनक हे अढळपद मिळविणारा पॉल गोंगे, लोकोत्तर डच चीत्रकार व्हिन्सेंट, व्हेन गॉ, नकलेचा प्रणेता पाब्लो पिकासो, त्याचप्रमाणे हेन्री मातीस, तीशीयन बेकेली, राफेल सांझी या चित्रकारांच्या कलाविष्काराची ओळख यातून होते.