Summary of the Book
हेमांगीचा ३६वा दिवाळी अंक यंदा ' समृद्ध शेजार ' विशेषांकाच्या स्वरूपात वाचकांसमोर आला आहे . कर्नाटक आणि गुजरात ही महाराष्ट्राची सख्खी शेजारी राज्ये . म्हणूनच मराठी - कन्नड - गुजराती भाषा साहित्य , संगीत , नाट्यसंस्कृती यांच्या समृद्धीचा शोध घेण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे .
कर्नाटक , महाराष्ट्र आणि गुजरात या तीन विभागांत विविध विषयांना हात घालण्यात आला आहे . तसेच काही कन्नड , गुजरातीमधील अनुवादित कथाही वाचायला मिळतील . शिवाय , ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सविस्तर मुलाखत तसेच जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कर्तृत्वावरही ओझरती नजर टाकण्यात आली आहे .