Summary of the Book
‘आनंदयात्री’ या छोट्याशा कादंबरीतील प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. अनेकदा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे माणसांना मिळत नाहीत. मनोवैज्ञानिकांच्या तर्कांनाही तडे जातात. जीवनाचे गणित मांडता येत नसते. ते मांडण्याचा प्रयत्न करणेच माणसांच्या हाती उरते ! ‘आनंदयात्री’ च्या लेखन प्रवासातील ही काही विचासूत्रे सूचकपणे मांडण्याचा लेखकाने केलेला हा प्रयत्न !