Summary of the Book
या लेखसंग्रहातील साहित्य सर्जनशील पातळीवरील आणि वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन घडविणारे आहे. संग्रहातील दहा लेख म्हणजे जणू काही जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारे दशरंगच आहेत.
सहजसोपी भाषा तरीही आशयपूर्ण ललित लेखनाचा बाज आणि डौल यांचा समतोल राखल्याने पुस्तक वाचण्याचा पुरेपूर आनंद देतं. एक सुंदर मुखपृष्ठ असलेला ‘माझा कुणीतरी’ हा प्रतिभा सराफ यांचा लेखसंग्रह आहे.