Summary of the Book
चाकोरीबद्ध जीवनात काहीतरी वेगळे घडावे, असे नेहमी वाटत असे नेहमी वाटत असते. हा धागा पकडून वसंत मिरासदार यांनी प्रो. ठणकापुरे आणि त्यांचा मानसपुत्र आबा शृंगारपुरे या जोडगोळीच्या भन्नाट कल्पना सामन्यांच्या कथांमध्ये पेरल्या आहेत. त्यांच्या 'नभ आक्रमिले डॉलरने'मधील प्रत्येक कथेमधून त्यामुळे निर्माण झालेला विनोद ताजा व वेगळा वाटतो. भंपक, विक्षिप्त व निरागस स्वभावाची ही जोडगोळी भन्नाट 'आयडिया' नी सामान्यांना स्वप्न दाखविते आणि त्यातून निर्माण झालेली विनोदाची फोडणी दिलेली चटपटीत कथा वाचताना आनंद मिळतो.