Summary of the Book
घरातील कामे करताना वेळ वाचावा, सूटसुटीतपणा आणावा, स्वच्छता नि आरोग्य राखावे यासाठ्जी निशा लिमये यांनी या पुस्तकात अनेक टिप्स दिल्या आहेत. अन्नधान्याची निगा कशी राखावी, हे सांगून त्यांनी पक्वान्ने, तळणी, दिवाळीचा फराळ कसा करावा, याविषयी काही सल्ले दिले आहेत.
उन्हाळी कामे, उपवास, केक करताना काय करावे याविषयी सांगून ज्येष्ठ नागरिक, नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही टिप्स दिल्या आहेत. कांदे पोहे, मेथीच्या वड्या भाजणीचे प्रकार, वाफवून, परतून करावयाच्या भाज्या असे पदार्थ चक्क मायक्रोवेव्हमध्ये करता येतात, हे तुम्हाला माहित आहे का?? कसे करायचे याची माहिती सुद्धा कुलकर्णी यांनी त्यांच्या 'मायक्रोवेव्हमधील ७५ पदार्थ' या पुस्तकात दिली आहे. पक्वान्ने, मांसाहारी, उपवासाच्या पदार्थांच्या कृतीही त्यांनी सांगितल्या आहेत.