Summary of the Book
ज्योत्स्ना चांदगुडे -लेखिका ,कवयित्री ,निवेदिका ,संपादिका अशा विविध माध्यमातून रसिकांना सुपरिचित असलेलं नाव ,व्यवसायानं शिक्षिका असलेल्या सौ .चांदगुडे सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत .अनेक मान्यवर संस्थांच्या कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे .
'अब्राहम लिंकन 'व 'सेवेचे फळ आणि दोन एकांकिका 'ही दोन बालसाहित्यातील त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत .पैकी 'सेवेचे फळ आणि दोन एकांकिका' या संग्रहास शासनातर्फे मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीस दिला जाणारा ९६ -९७ सालचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
साहित्यक्षेत्रात स्वतःची स्वतंत्र वाट शोधणाऱ्या ज्योत्स्ना चांदगुडे यांचा 'चिरंजीवी सप्तक' हा नवा एकांकिका संग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले असा विश्वास वाटतो .