Summary of the Book
देशी-विदेशी साहित्याइतकेच हिन्दी चित्रपट व गाणे यांवर मनापासून प्रेम असणार्या श्री. विजय पाडळकर यांनी मांडलेला उत्तम साहित्यकृती व त्यावर आधारित चित्रपट यांचा ललित आस्वाद `चंद्रावेगळं चांदणं’ या पुस्तकातून आपणांस वाचावयास मिळतो. `तिसरी कसम’, `आंधी’, `भुवनशोम’, `गाइड’ आदी चित्रपटांचा व त्यांच्या मूळ साहित्यकृतींचा हा रंगतदार प्रवास वाचकांना खिळवून ठेवतो. समृद्ध ललित लेखन परंपरेतील `चंद्रावेगळं चांदणं’ हे त्यातील आस्वाद मूल्यांमुळे अजोड ठरेल.
श्री. विजय पाडळकर यांची `देखिल अक्षरांचा मेळावा’ आणि `कथांच्या पायवाटा’ ही पुस्तकेही चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.