Summary of the Book
आम्ही मुलांना जगाच्या बाजारात नोकरी देण्यास जास्त सक्षम आहोत, असा पोकळ दावा करणाऱ्या शिक्षणसंस्था, आपलं मूल चालायला लागण्यापूर्वीच ते सर्वज्ञानी होण्याची आस धरून त्यांना शाळेत दामटविणारे पालक आणि विद्यार्थ्यांच्या घडण्यावरच अविश्वास व्यक्त करणारे शिक्षक यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. त्यातही मुलांच्या सक्षम आणि निरागस घडण्यावर गाढ विश्वास असलेले; परंतु समाजाच्या रेटय़ात त्याबद्दल दोलायमान मनोवस्था झालेल्या पालकांसाठी हे पुस्तक खूपच मार्गदर्शक ठरेल.