Summary of the Book
प्रस्तुत पुस्तकात गणपतीबद्दलची शक्यतो सर्व माहिती साध्या, सोप्या व रंजक भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी मुद्दामच सर्वसाधारण लोकांना माहिती नसलेली स्तोत्रे व कवने दिली आहेत. अगदी छ. संभाजीराजांचे खड्या हिंदीतील कवन आणि स्वा. सावरकरांचे गणेशावरील काव्य यांचा समावेश आहे. आबालवृद्धांसाठी अर्थासहित 'अथर्वशीर्ष' दिले आहे. आद्य शंकराचार्यांची श्रीगणेश पञ्चरत्नं आणि गणेश भुजङ्गम् ही स्तोत्रे अर्थासहित दिली आहेत.