Summary of the Book
मन कसे असते कसे दिसते हे कोणीही सांगू शकत नाही. पण प्रत्येकजण अनुभवू शकतो.मनात अनेक विचार,ताण-तणाव असतात. सुख, दुःखाची किनार असते. त्याचे प्रतिबिंब साहजिकच व्यक्तीमत्वावर पडते. यासाठी मानाचे आरोग्य राखणे, मन निरोगी ठेवणे महत्वाचे ठरते. ते कसे करायचे याचे मार्गदर्शन वा अनघा लवळेकर यांनी 'मनाच्या आरोग्य वाटा'मधून केले आहे.
मन म्हणजे काय दुःख, संशय, हट्टीपणा, मन:स्वास्थ्य घडविण्यास आवश्यक कौशल्य,पतीपत्नीमधील संवाद, सहजीवन, स्त्रियांचे मानसिक आरोग्य, काळाच्या शर्यतीत राहण्यास आवश्यक गोष्टी, संघटीत वृत्तीमुळे मनावर होणारे सकारात्मक परिणाम रोजच्या जगण्यामागे प्रेरणेचा मागोवा कसा घ्यावा, याचे विवेचन उदाहरणांसह केले आहे. संवेदन मनासाठी केलेले हे संवेदनशील लेखन वाचकांना आनंदी, सुखी आयुष्य जगण्याची दिशा दाखवते..