Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारतीय व्यवसायामध्ये निश्चित आणि कायमस्वरूपी बदल कसा होऊ घातला आहे, याचा शोध अॅलन रॅाजलिंग यांनी 'बूम कंट्री ?' या आपल्या पुस्तकात घेतला आहे. उद्योजक आणि भारताचे धोरण सल्लागार म्हणून अॅलन रॅाजलिंग यांनी ३५ वर्ष काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या शोधाला विशेष महत्त्व आहे.उद्योग आणि स्टार्ट -अप्स्ची नवी लाट, तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती, सरकारी पातळीवरच्या सुधारणा आणि जोखीम पत्करूनही होत असलेली भांडवल उभारणी या घटकांमुळे नवीन उद्योगांच जाळं फार मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे, असं ते लिहितात. या सगळ्याचा परिणाम म्हणून सांस्कृतिक बदलही होत आहेत. विशेषतः तरुण पिढीला 'वेगळ काहीतरी करून बघण्याची' इच्छा होत आहे. अॅलन यांचं स्वतः च अनुभवविश्व समृद्ध आहेच. त्या जोडीला, त्यांनी आघाडीच्या १०० हून अधिक उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यात पारंपारिक व्यावसायिक समूहांतील टाटा, महिंद्रा, बिर्ला, गोदरेज, पहिल्यांदाच उद्योग सुरु केल्यानंतर आता स्थिरावलेल्या पिढीतील सुनील मित्तल, किशोर बियानी आणि नारायण मूर्ती आणि नवीन पिढीतल्या आधुनिक स्टार्ट - अप्समधील सचिन बन्सल, भाविश अगरवाल, विजय शेखर शर्मा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही सरकारी मंडळींच्याही त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. या पुस्तकात रॅाजलिंग यांनी भारतात व्यवसाय करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेत, पारंपारिक आणि आधुनिक व्यवसायांचं भवितव्य काय, वगैरे बाबींच तपशीलवार विश्लेषण केलेलं आहे, तरीही, वैश्विक स्तरावर बदलू पाहणारे व्यवसाय आणि प्रचंड क्षमता असूनही भारताने नेहमीच अपेक्षेइतकी कामगिरी न करणं, या दोन कारणांमुळे त्यांच्यासमोर एक कळीचा प्रश्न उभा राहतो. अजूनही वयात न आलेल्या, या काहीशा अपरिपक्व उद्यमशीलतेच्या लाटेमध्ये खरंच भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याइतकी ताकद आहे का? ही ताकद भारताला नवीन उद्योगांसाठी खऱ्या अर्थाने एक 'बूम कंट्री' करू शकेल का ?