Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वात मोठं वळण आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयाचे नायक नरेंद्र मोदी होते. केवळ सत्ताबदल नव्हता. या दृश्य राजकीय बदलाच्या पोटात राजकारणापलिकडंही देशाच्या वाटचालीत वळण आणणारे अनेक छोटेमोठे बदल दडले होते. दीर्घ काळात देशातलं जनमानस मध्याकडून उजवीकडं नेण्याच्या चिकाटीच्या प्रयत्नांना आलेलं ते फळही होतं. मोदी, भाजप किंवा संघ परिवार मांडत असलेल्या देशाच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेनं उघड पावलं टाकण्याची संधी साधण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदींच्या सत्ताकाळात झाला. मोदीं यांच्या सत्ताकाळातील प्रमुख निर्णय, राजकीय बदल, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरची स्थित्यंतरं, बदलती राजकीय परिभाषा, संस्कृती, मुख्य प्रवाहात आलेला बहुसंख्यांकवाद; यांचा धांडोळा 'मोदिपर्व' मध्ये घेतला आहे. तसेच समाज म्हणून, देशावरचे परिणाम 'आयडिया ऑफ इंडिया' किंवा देशाच्या वाटचालीचे आधार कोणते यावर होत असलेले परिणाम याविषयीचं समग्र आकलन मांडण्याचा प्रयत्न 'मोदिपर्व' या पुस्तकात केला आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीचं द्वेष आणि अंधभक्ती या टोकाच्या दृष्टीकोनांपलिकडं केलेलं हे विश्लेषण आहे.