Summary of the Book
‘भारतीय असंतोषाचे जनक’ या नात्यानेच आपण आजवर लोकमान्यांकडे पाहत आलो. त्यांच्या व्यक्तित्वाचे इतर लोकविलक्षण पैलू बरेचसे अंधारातच राहिले. त्यांची ज्ञानपिपासा, लोकसंग्राहक वृत्ती, लोकनुवर्ती भाषाशैली, गणिती तर्ककठोरता, ज्योतिर्विज्ञानाची जिज्ञासा इत्यादी त्यांच्या व्यक्तित्वातील घटकांविषयी केवळ वस्तुनिष्ठ पुराव्याचा आधार घेऊन लिहिलेले आणि लोकमान्यांच्या श्रेष्ठत्वाचे रहस्य उकलवून दाखवणारे हे पुस्तक त्यांच्याकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल, हे नि:संशय.