Summary of the Book
महादाईसा, मुक्ताबाई, बहिणाबाई, जिजाबाई, मिसेस सिंथिया फरार, रेबेका सिमियन,
डॉ. आनंदीबाई जोशी, ताराबाई मोडक, गोदावरी परुळेकर, मेधा पाटकर, मदर तेरेसा,
हिराबाई बडोदेकर, बेगम अख्तर, पी. टी. उषा, बचेंद्री पाल, या स्त्रियांमध्ये समान गोष्ट कोणती?
या साऱ्या जणींनी आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य केलं आहे.
या सगळ्याच कर्तुत्ववान आहेत. त्या तशा आहेत म्हणूनच आपल्याला त्यांच्याविषयी जाणून
घ्यायला हवं. या अशा १०१ कर्तुत्ववान स्त्रियांची ओळख डॉ. स्वाती कर्वे यांनी करून दिली आहे.
या सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रातिनिधिक आहेत. त्यातही महाराष्ट्रातील स्त्रियांना
प्राधान्य देण्यात आलं आहे.