Summary of the Book
एकपात्री कलावंत मंजिरी धामणकर यांच्या ललित लेखांचा हा संग्रह. भान, सफरचंद, जाते थे जापान - पहुँच गये चीन, साधना, वारसा अशा पाच भागांत यातील लेखांची विभागणी करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात साध्या साध्या वाटणाऱ्या प्रसंगांतून लेखिकेला जे मोलाचे अनुभव आले ते पहिल्या भागात येतात. विविध व्यक्तींशी साधलेला संवाद यातील एका भागात येतो.
साधीसोपी शब्दरचना आणि लेखनातील ओघवता प्रवाह यामुळे लेख वाचनीय झाले आहेत. पुस्तकातील काही लेखांचं अभिवाचन करून त्याची ऑडिओ सीडीही पुस्तकासोबत देण्यात आली आहे.