Summary of the Book
अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला आणि ओसामा बिन लादेन यःचे नांव झळकायला लागले. त्याच्या अल् काईदा या संघटनेने हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली. महासत्तेवरील हल्ल्याने दहशतवादाची छाया सर्व राष्ट्रांवर पसरली. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी पाय रोवले होते. पाकिस्तानमधील पत्रकार सईद सलीम, शाहजाद यांनी दहशतवादाविषयी वेळोवेळी लिहिले आहे. लादेन मारला गेल्यानंतर इनसाइड अल् काईदा अँड तालिबान बियॉड नाइन इलेव्हन' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर काही दिवसांतच शाहजाद यांचा मृतदेह शेतात सापडला.
अल् काईदा व तालिबानचे भयानक रूप पुस्तकातून निर्भीडपणे दाखवून दिले आहे. या दोन्ही संघटनांच्या संपर्कात ते असल्याने या पुस्तकातून सत्य माहिती कळते. भारताबद्दल विचार करताना हे पुस्तक महत्वपूर्ण आहे. पाकिस्तानात सध्या काय सुरु आहे, भारताबद्दलचा मतप्रवाहही कळतो. त्याचा अनुवाद अरविंद व्यं. गोखले यांनी अल् काईदा ते तालिबान या पुस्तकाच्या रुपाने केला आहे.