Summary of the Book
"आम आदमी पार्टी' या पक्षाचे संस्थापक आणि जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन उभं करणारे नेता आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लिहिलेलं हे छोटेखानी पुस्तक केजरीवाल यांच्याबद्दलची माहिती नेमकेपणानं देतं. केजरीवालांच्या नोकरीच्या सुरवातीच्या काळातील माहिती, तसेच दिल्लीतील "आप'चं सरकार आणि केजरीवाल यांचं आंदोलन व "आप' पक्षाची ध्येयधोरणं, तसेच कार्यक्रम याबद्दल या पुस्तकात माहिती मिळते.