Summary of the Book
शेगावचे श्री गजानन महाराज हे एक अलौकिक साक्षात्कारी संत. त्यांचे चरित्र आणि भक्तगणांना त्यांच्याविषयी आलेल्या अनुभवांचा समावेश या पुस्तकात केला आहे. भा. द. खेर यांचे हे पुस्तक म्हणजे महाराजांच्या भक्तांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. गजानन महाराजांची 'श्री गजानन विजय' ही पोथी का वाचावी, त्या पोथीची फलश्रुती कोणती हेही पुस्तकात सांगितले आहे.
खेर यांनी हे पुस्तक लिहिताना 'गजानन विजय'मध्ये लिहिलेल्या सर्व स्थळांना भेटी दिल्या होत्या. संबंधित अनेक व्यक्तींचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे या पुस्तकाला वेगळे महत्व आहे. या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महारजांच्या अलौकिक चमत्कारांची शास्त्रीय मीमांसाही खेर यांनी केली आहे.