Summary of the Book
केनिया हा आफ्रिका खंडातील विषुववृत्तावरील एक छोटासा देश. पाच महिने उन्हाळा आणि दोन महिने हिवाळा अशा हवामानामुळे येथे मैलोनमैल पसरलेला गवताळ प्रदेश आहे
केनियाचे निसर्ग भांडार डॉ. संदीप श्रोत्री यांनी 'काटेरी केनियाची मुलायम सफर'मधून शब्दांच्या भांडारातून वाचकांसमोर उघडले आहे.
नैरोबी नॅशनल पार्कमधील प्राणी - पक्ष्यांची अनाथालय, जागतिक भौगोलिक वारसा असलेला माउंट केनिया, तेथील वनसंपदा व वन्यजीवन, सांबरू या राष्ट्रीय उद्यानातील पक्ष्यांचे नंदनवन, शहामृग, गिनी फाउल्स, मार्शल गरुड, काळवीट, बिबट्या, रानम्हैस, रानरेडा आदी खास आफ्रिकेत सापडणारे प्राणी यांचे दर्शन यात घडविले आहे.
विविध प्राणी व पक्ष्यांची माहिती, त्यांच्याविषयीच्या मनोरंजक गोष्टी, अगदी हत्ती व उंदीर अशा प्राण्यांची वैविध्यपूर्ण माहिती आपल्या ज्ञानात भर घालते.
आफ्रिकेचा राजा असलेला सिंहाचे घर असलेले मसाई मारा, रिफ्ट व्हॅलीतील भूगर्भशास्त्रीय चमत्कार, लेक नाकारूतील रोहित पक्षी, अजगर, मगर, कासव, हत्ती, गेंडे, जिराफ व सर्वात महत्वाचे म्हणजे आता फक्त पूर्व आफ्रिकेत शिल्लक असलेला चित्ता आदींचे वर्णन वाचताना आपलीही जंगल सफारी होते.