Summary of the Book
दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाचा समाजशास्त्रीय अभ्यास डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी या पुस्तकातून मांडला आहे. ठाकरांच्या रूढी, परंपरा, विवाह इतर संस्कार यांसंबंधीचे संशोधन पुस्तकात वाचायला मिळते. आदिवासी ठाकरांचे सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन व वैवाहिक जीवन यांची माहिती स्वतंत्र प्रकरणामधून दिली आहे. आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक बाजूंवरही डॉ. सूर्यवंशी यांनी प्रकाश टाकला आहे.
ठाकरांच्या वनौषधीबद्दलच्या अभ्यासाचा उल्लेखही त्यांनी केला आहे. या अभ्यासात ठाकर आदिवासींच्या बोलीतील सुमारे चारशे वाक्ये दिली असून, त्यांचा मराठीत अर्थ दिला आहे. ठाकरांच्या गीतांचे संकलनही केले आहे. अजिंठा डोंगर परिसरातील ठाकरांच्या बोलीत आढळणाऱ्या काही शब्दांची सूचीही पुस्तकात दिली आहे.