Summary of the Book
'निवडक भटकंती' या पुस्तकाचे संपादन करताना भटकंतीच्या जुन्या अंकांतील असे काही निवडक वैशिष्टयपूर्ण लेख निवडले, की वाचकांना त्या स्थळाविषयी, तिथल्या निसर्गसौंदर्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं वं तिथं कधी प्रत्यक्ष गेल्यावर ते सगळं एका वेगळ्या दृष्टीने अनुभवताना निसर्गाविषयीचे कृतज्ञतेचे भाव त्यांच्या मनात निर्माण व्हावेत!
हे सारे लेख लिहिणारे हात, निसर्गाशी वेगवेगळ्या प्रकाराने व सातत्याने संवाद साधणारे असल्याने त्यांचं लिखाण मनात ठसतं. हे ठसण्यासाठी तेवढ्याच उत्कट आणि अन्वर्थक छायाचित्रांचादेखील समावेश करण्यात आला आहे; ज्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. त्या छायाचित्रांची मांडणी आकर्षक वं आल्हाददायक असल्यामुळे वाचक या पुस्तकाच्या प्रेमात नक्कीच पडतील यात शंका नाही.