Hard Copy Price:
25% OFF R 600R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी लिहिलेल्या गुप्तहेर फेलुदाच्या रहस्यकथा आजही लोकप्रिय आहे. म्हणूनच या सर्व कथांचा अनुवाद अशोक जैन यांनी 'फॅन्टास्टिक फेलुदा'मधून मराठी वाचकांसाठी केला आहे. त्यातील ११ कथांचा गोल्डन संच नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
पूर्वीच्या सर्व कथांप्रमाणेच यातील कथा उत्कंठावर्धक व चित्तथरारक आहे. फेलुदा, त्याचा चुलत भाऊ तपेश उर्फ तोपशे, रहस्यकथा लेखक लालमोहनबाबू उर्फ जटायू या त्रिकुटाने एका उच्चभ्रू माणसाने दाखविलेल्या फोटोतील व्यक्तीचा लंडनमध्ये जाऊन घेतलेला शोध, बोराल यांच्याकडील गुलाबी मोतीचे उलगडलेले रहस्य, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मुन्शी यांच्या डायरीतील रहस्य, जादूच्या प्रयोगात काम करणाऱ्या अफाट बुद्धीक्षमतेच्या नयन या लहान मुलाचे अचानक गायब होणे,
रॉबर्टसनचे मौल्यवान माणिक सुरक्षित ठेवण्याचा जबाबदारी, महितोष रॉय यांना येणाऱ्या धमक्यांचा शोध, शिक्षा दिलेल्यांच्या आत्म्याशी संवाद साधणारे माजी न्यायाधीश मलिक यांची हत्या व फेलुदावरील हल्ले यांच्यामागील कारण, नाटक कंपनीतील काम करणाऱ्या आचार्यांच्या खूनप्रकरणाचा फेलुदाने लावलेला छडा या सर्व कथा वाचताना आपण गुंग होऊन जातो.