Summary of the Book
भार्गवराम म्हणजे मूर्तिमंत तप: साधना आणि वेदधर्माचा साक्षात् अविष्कार. वेदांना अभिप्रेत असणा-या विश्वधर्माचे कार्य त्यांनी युगायुगातून केले. विश्वमानवाच्या कल्याणासाठी पुनःपुन्हा तो धर्म त्यांनी प्रस्थापित केला. आपले या युगातील असामान्य प्ररमशिष्य प्ररमसदगुरु श्रीगजाननमहाराज यांच्याकडून वेदधर्माचे पुनरुज्जीवन करवून कृतयुगाचा प्रारंभही करून दिला, त्याचे हे ओझरते दर्शन.