Summary of the Book
राग ही सुद्धा नैसर्गिक भावना आहे. 'राग' येणं आणि तो व्यक्त करणं हे चुकीचं नाही. पण त्याची तीव्रता ओळखायला आपण शिकलं पाहिजे. रागाला बाहेर पडण्यासाठी सकारात्मक मार्ग दिला नाही, तर आपली अवस्था प्रेशर कुकरसारखी होऊ शकते. रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य नसले तरी काही प्रमाणात आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडून, आयुष्य अधिक आरामदायी व संतुलित होईल हे जाणून घेण्यास या पुस्तकाची मदत होईल.