Summary of the Book
भारतामध्ये आढळणा-या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक अशी विविध कथानके चित्रकथांच्या स्वरुपात वाचकांकरता ‘मेनका प्रकाशन’ आणत आहे. यासाठी ‘मेनका चित्रकथा’ या नावाने एक स्वतंत्र विभाग सुरू करत आहोत.
‘मेनका चित्रकथा’ मालेतलं पहिलं पुस्तक सर्वांगसुंदर श्रीगणेशाच्या नमनानं सादर करत आहोत. आराध्य दैवत असणा-या अष्टविनायकाच्या जन्माच्या कथा, तसंच त्या-त्या स्थळांचं स्थानमहात्म्य अष्टविनायक चित्रकथेतून मांडण्यात आलं आहे.