Hard Copy Price:
15% OFF R 150R 128
/ $
1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रेम आणि वासना, मोह आणि आकर्षण यातील सीमारेषा आखता येऊ नये असे प्रसंग अनेकांच्या वाट्याला येतात. मात्र बहुसंख्यांना अशा अनुभवातून आरपार गेल्यानंतरच आपल्या वाट्याला काहीतरी विलक्षण असं येऊन गेलं, अशी जाणीव होते. त्याची हुरहूर वाटू लागते. अनेकांच्या मनाच्या कप्प्यात हे अनुभव बंदिस्त होऊन राहतात आणि निवांतक्षणी ते अचानकपणं उफाळून वर येतात. मन अस्वस्थ करतात.
आपल्या वाट्याला आलेला अद्भुताचा क्षण आपण पकडू शकलो नाही; कारण आपल्याला ती अद्भुतता आहे, हेच कळलं नव्हतं, ही दु:खद जाणीव त्याला होते. हे दु:ख मग त्यांना प्रदीर्घ काळपर्यंत छळत राहतं. फारच थोडक्यांना आपल्याला आलेल्या अनुभवाकडं कालांतरानं तटस्थपणं पाहता येतं. ही तटस्थता अर्थातच वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या विविवधांगी अनुभवांचा विचार करण्याची सवय असणाऱ्यांतच येण्याची शक्यता अधिक असते. काळाच्या ओघात आता दूरवर गेलेल्या परंतु आपल्या मानसिक आणि भावनिक विश्वावर अमीट ठसा उमटविणाऱ्या त्या अनुभवाकडं पाहताना परिपक्व मनाला त्या अनुभवाचे अनेक पदर दिसू लागतात.
त्या अनुभवातील अनेक संभाव्यता वाकुल्या दाखवू लागतात. अनेक गोष्टींची शक्यता पोटात घेऊन येणारे आणि आयुष्याच्या नौकेला वेगळाच रस्ता दाखविण्याची शक्ती असणारे ते क्षण मनात पुन:पुन्हा घोळले जातात आणि मन:पटलावर तयार होणारे चित्र कागदावर शब्दांच्या माध्यमातून कागदावर उतरवले जाते. 'बाधा' या मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केलेल्या कथासंग्रहात अशाच अस्फुट अनुभवांचं फार सशक्तपणं केलेलं चित्रण आहे.