Summary of the Book
जागतिकीकरण, महासत्तांची युद्धखोरी, युद्धांमागचे अर्थकारण, जगात घडणाऱ्या विविध घटनांमागचे सत्ताकारण, विकसित देशांची दादागिरी या साऱयांची मांडणी करणारे लेख.
व्यवस्थापन क्षेत्रातील, आंतरराष्ट्रीय स्तारावरील अनुभव, अनेक देशांत कामाचा अनुभव, केलेला प्रवास यांमुळे विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांची असलेली सखोल जाण लेखक श्री. करंजीकर यांच्या लेखनातून व्यक्त होते.
वेगवेगळ्या विषयांतील छोटे-छोटे लेख. महत्त्वाच्या बाबींची नोंद घेतलेली, सर्वसामान्यांना माहिती नसलेले अनेक बारकावे नोंदवलेले, आवश्यक तिथे तक्ते, आलेख, नकाशे अशा साधनांचा सांख्यिकी माहिती देण्यासाठी उपयोग.
सहज, सोपी तरीही शेलीदार भाषा. विरोधात्मकता व्यक्त करणारी आकर्षक शीर्षके.
मान्यवर साहित्यिक श्री. रंगनाथ पठारे यांची आशयगर्भ प्रस्तावना.