Summary of the Book
देवीचे नवरात्र लवकरच सुरु होत आहे. कुळाचार म्हणून घरोघरी घट बसतील. ते का बसवितात, नवरात्र साजरे का करतात हे फारसे माहित नसते. कुलाचार व कुळधर्म का करतात, याविषयी जिज्ञासा असेल तर 'कुळधर्म - कुलाचार - कुलदैवते ' हे पुस्तक वाचायला हवेच.
गजानन शं. खोले यांनी या कुळातील आचार, शास्त्र कर्मे व कुलदैवतांचे महत्व, कुळाचाराचे प्रयोजन, कुलदैवतांचे अवतार, देवपूजा कशी करतात. श्रीगणपती पूजन, कार्तिक स्वामी, महादेव, त्यांचे अवतार, देवीची रूपे, अवतार.
शक्तिपीठे, बारा ज्योतिर्लिंग, विशात्म्क नारायण, त्यांचे रूपे, रामनवरात्र, हनुमाननवरात्र, तुळशी विवाह, श्रीलक्ष्मी व तिची रूपे, दत्तजन्म, दत्तक्षेत्रे, कुळधर्मातील विधी, त्यातील साहित्याचे महत्त्व, विवाहविधी, देवदेवतांचे विवाह, सण- उत्सवांची महती, त्याविषयीच्या कथा यात आहेत.
सणवार, देवता, पूजा - अर्चा याबद्दल असलेल्या शंकांचे निरसन या पौराणिक - धार्मिक माहितीतून होते.