Abhishek Thamke
04 Jan 2014 05 30 AM
एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी.... मैत्र जीवांचे ही मैत्रीवर आधारित एकविसाव्या शतकातील आधुनिक कादंबरी आहे. या मध्ये मैत्रीशिवाय तंत्रज्ञान, संगीत, भारतीय संस्कृती, गुगल, जर्मनी संस्कृती, ऑस्ट्रेलियन संस्कृती अशा अनेक गोष्टींची माहिती कथेच्या आधारे देण्यात आली आहे. कादंबरी आपल्याला हसवते आणि रडवते देखील. लेखकाने कादंबरी मधील रहस्य अगदी शेवटपर्यंत सांभाळून ठेवले आहे. आधुनिक समाजाला आवडणारी ही एक दर्जेदार मराठी कादंबरी आहे. सदर कादंबरी पाहता मराठी लेखाकामध्ये असलेली वास्तव्यता आपल्या लक्षात येते. 'मैत्र जीवांचे' कादंबरी मध्ये मराठीसह हिंदी, इंग्रजी, जर्मन, पौर्तुगीज, आफ्रिकन भाषांचा वापर अर्थासह करण्यात आला आहे, ज्यातून लेखक वाचकाला कादंबरीशी एकरूप ठेवतो.