Summary of the Book
अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रतिभावान संतूरवादक पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक. त्यांनी पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली आहे. वाद्य जुळविण्याची 'क्रोमॅटिक'पद्धती त्यांनी शोधून काढली.
पं. बापट यांचेच हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. आपल्या सांगीतिक वाटचालीचे सिंहावलोकन त्यांनी या पुस्तकात केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबरच संतुरही ठळकपणे समोर येते.
पं. बापट यांच्या सहवासात आलेल्या त्यांचे व्यक्तिमत्व घडविणाऱ्या झरीन दारूवाला, पं. के. जी. गिंडे, पं. वामनराव सडोलीकर, उस्ताद निजामुद्दीन खाँ साहेब, नूर महंमद, ओ. पी. नय्यर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबरच अभिनेत्री रेखासह अन्य सुपरस्टार्सच्या आठवणीही ते सांगतात.
विविध प्रकारच्या श्रोत्यांची ओळखही होते.