Summary of the Book
पडीक जमिनीतील झाडे कोरडवाहू फळझाडांची असल्यास अर्थार्जन सर्वोत्तम होते हे अनुभवसिद्ध सत्य आहे. ‘चिंचपरिवाराची’ (उत्पादकांची) संघटना स्थापन करून हजारो हेक्टरवर चिंच लागवडीचा संदर्भात बहुमोल कार्य करणार्या कृषिभूषण वि. ग. राऊळ यांनी अत्यंत तळमळीने ह्या पुस्तकाचे लेखन केले आहे. लागवडीच्या संपूर्ण माहितीसह त्यांनी या उत्पादनाचे अर्थशास्त्र आणि बोलके अनुभव फोटोंसहित दिले आहे. दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्यांसाठी मार्गदर्शक असल्याने हे पुस्तक अवश्य खरेदी करण्यासारखे आहे.