Summary of the Book
लोकगाण्यांतून समाजाचे रंजन व प्रबोधन करण्याची परंपरा भारतात पूर्वीपासून आहे. आपल्या आराध्य देवतेचे महत्त्व गीताच्या माध्यमातून सांगणारे अनेक लोकगायक प्रांतोप्रांती आहेत. ही परंपरा सध्याच्या बदलत्या काळात मागे पडत चालली आहे. वाघ्या, मुरळी, वासुदेव, पिंगळा, वही-गायक आदी कलाकारही व्यवसायाचे दुसरे क्षेत्र शोधू लागले आहेत. मात्र ही कला जतन करणे आवश्यक आहेत. त्याचा एक प्रयत्न प्रभाकर मांडे यांनी ‘लोकगायकांची परंपरा’मधून केला आहे. या कला, ते सादर करणारे कलावंत, काळानुसार त्यात झालेले बदल याची माहिती या पुस्तकात मिळते.