या नाटकातील काही समस्या, त्या त्या माणसाच्या स्वभावामुळे, काही संस्कारामुळे, काही वृत्तींमुळे, काही आसपासच्या माणसांमुळे, वातावरणामुळे निर्माण झालेल्या दिसतात. कमी अधिक प्रमाणात, आपल्यालाही कुठे कुठे [...]
जीवनातील आणि त्याच्याही पलीकडील सत्याचा शोध घेणे, हे गूढकथेचे लक्ष्य असते.
वरवर अवास्तव वाटणारी गूढकथा, वास्तवाचा व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असते.
- पंचमहाभूतांमधील वायूचे झपाटून टाकणे…
[...]
मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणारया रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथांचा ताजा संग्रह.
भीतीच्या विविध स्वरूपांमधून मानवी मनाचे अथांग
व्यापार शोधणाऱ्या आणि म्हणूनच मराठी कथा साहित्यात आढळपद
मिळवणाऱ्या रत[...]
‘आरण्यक’ हे रत्नाकर मतकरी यांचे पद्यबंधातले पौराणिक नाटक आहे. याची कथा महाभारतातील आहे. भारतीय युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर वनात जातात, ती ही कहाणी.
मरणक्षणीही चंचल चित्त असणारा धृत[...]
रत्नाकर मतकरी यांचे पहिले प्रकाशित बालनाटक `मधुमंजिरी’ 1959 चे. आज, 2001 संपताना-42 वर्षांनंतरही, त्यांच्या पहिल्या नाटकाइतकेच टवटवीत, खेळकर, रंगतदार असे हे नाटक-`चमत्कार झालाच पाहिजे!’
दरम्यानच्या क[...]
8 प्रयोगक्षम रहस्यप्रधान एकांकिकांचा हा संग्रह…
रत्नाकर मतकरी यांच्या गाजलेल्या गूढकथांमध्ये जी नाट्यपूर्ण विविधता दिसते, तीच या एकांकिकांमधून दिसून येते.
अतींद्रिय अनुभवांपासून ते वास्तवातील विसं[...]
मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिलं, फासावर लटकावलं, हे मनाला खातच होतं. कुठंही दोरी दिसली, की ते सारं आठवायचं. मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. माझं वागणं शहाणपणा[...]
रत्नाकर मतकरी हे रहस्यकथा प्रकारातील एक सिद्धहस्त नांव. सत्य आणि कल्पनेची रसमिसळ होऊन त्यांच्या कथातून एक विलक्षण जग आकाराला येते. वाचकाला गुंतवून ठेवते. मतकरी यांचे हे पुस्तक आपल्याला अशाच इजा वेगळ्य[...]
‘समजून घे, तिला समजून घे !
तिनं केले कितीही प्रहार, कितीही दुखावलं तुझं मन,तरी, प्रमिले, गिळून टाक राग आणि सारं कर सहन !
तिला ठाऊक आहे, की आपली आई आहे व्रतस्थ तरीही तिला आनंद होतो, प्रमिले,तुझ्याव[...]
'महाकवी, महानाटककार, महाशेक्सपियर महाचालू! तो म्हणतो, प्रेम प्रेम ते काय? ये तो बस नजर का धोखा है! तुम्ही म्हणा, प्रेम हृदयात असतं... शेक्सपियर म्हणतो, ते नजरेत असतं! कधी कोणाची नजर पडेल, जादू होईल आण[...]
आजच्या पित्याच्या हृदयाचा सल, त्याच्या अंतरीची ओढ रत्नाकर मतकरी यांच्या ‘जावई माझा भला’ या नाटकातून प्रकट होते, तेव्हा ते नाटक प्रेक्षकातल्या प्रत्येक पित्याचे आणि मातेचेही होते...
ते जसजसे उलगडत [...]
वास्तववादाचा किंवा अद्भुतवादाचा असा कुठलाच झेंडा मतकरींनी खांद्यावर घेतलेला नाही. ज्यातून एखादी ‘आकृती’ साकार होईल, असे त्यांना जाणवते, ती कथावस्तू व त्याला अनुरूप असा वाङ्मयप्रकार ते निवडतात. ‘जौळ’ स[...]
गूढकथा म्हणजे काय ? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट [...]
खेकडा' या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून[...]
नानांच्या या खुर्चीत बसलं की...
... मनात अनेक प्रश्नांचं वादळ घोंगावू लागतं. वाटतं, ज्याला आपण नीती-नीती म्हणतो, ते खरं असतं तरी काय? आपली नीतीची कल्पना आपण दुसर्या माणसावर लादू शकतो का?
हे प्र[...]
"तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो... गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा ! पोपटाच्या चोचीसारखं नाक ! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे ! मला तर त्यांच्या डोळ्यांची भीतीच वाटत[...]
महाराष्ट्राची लावणी
भुर्रर्र
पाही चकित होऊन दुनिया ग सारी
बाई माझ्या राज्यानं घेतली भरारी
बाई महाराष्ट्रानं घेतली भरारी।।
खर्च कराया चंगळ किती किती सोयी
चकाचक उंच मॉल उभे त्यांच्यापायी
रस्ते अ[...]
मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी मी त्याचा सूड घेईन ! मी जिंकेन मरणाला ! मला कैवल्यवाणी येते..... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्य[...]
बोलावणं... निजधाम... जेवणावळ...
रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एकनवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यप[...]
मतकरींच्या प्रगल्भ शैलीतून साकार होत असलेल्या, अगदी अलिकडच्या गूढकथांचा हा संग्रह.
वास्तवाच्या पायावर उभे असलेले कल्पनेचे जग, मानसशास्त्रवर आधारलेले भीतीचे विश्व मतकरींच्या कथांमधून साकार झाले आहे. उ[...]
‘‘तुम्ही कधी ऽ कुणावर शुद्ध प्रेम केलंय का ?
जेथे मनाला मन साद देते
शतजन्म जुळते तेथेच नाते
जग हे दरिद्री हमखास चुकते
संगास भुलुनी प्रेमास मुकते
ते प्रेम नि:शब्द दंवपावलांनी
भेटीस आलंय का? तुम[...]
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी 'खळ्ळ्' आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले ! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की[...]
काळोखातून आपल्याच दु:खाची वाट चालत नंदिता स्मशानभूमीत येऊन पोहोचलेली. लांबवर एक चिता जळत असलेली. तिचा अंधुक उजेड सगळीकडे पसरलेला. तोही मधूनमधून कमीजास्त होत असलेला. धाप लागल्यासारखा. इथेच-इथेच तो आला [...]
प्रत्येक चांगल्या, जाणकार आणि विचारी लेखकाच्या कलाकृतींच्या अंतरंगात डोकावून पाहिलं, तर त्यात त्या त्या लेखकाचं म्हणून एक वैशिष्ट्यं, जीवनदृष्टी आणि तो करू पाहात असलेलं विधान हुडकता येतं. त्याचा कशावि[...]
जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : "सोनेरी मनाची परी' अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरुणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा- खरं त[...]
तन-मन' : आजच्या स्त्रीची बंडखोरी हे नाटक शीर्षकातील शब्दजोडीप्रमाणेच दुपेडी विणीचे आहे. वैयक्तिक नजरेतून एक व्यापक सामाजिक मानसिकतेचा भेदक चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. नवरा-बायकोच्या वैयक्तिक संबंधांची[...]
तुमचे अमुचे गाणे’ हे केवळ नाटक नाही. रंजकतेत भर टाकावी, म्हणून केवळ त्यात संगीत टाकलेलं नाही, तर नावाप्रमाणेच हे संपूर्ण नाटक म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं जीवनगाणं आहे. त्याच्या साध्या आयुष्[...]
विठो रखुमाय : एक भावगर्भ अनुभव
विठोबा हा देव. रखुमाय हीही देव. पण त्यांच्या या मानवी कथेकडे पाहायचं कसं? त्याला अनेकानेक दिशा आणि रंग आहेत. कोणी त्याच्याकडे कौटुंबिक संघर्षनाट्य म्हणून पाहील, तर को[...]