Summary of the Book
आंबेडकरी चळवळीत महत्त्वाचं स्थान असलेल्या गायक, वादक आणि गीतकार यांची ओळख करून देणारं हे पुस्तक. बुद्ध व आंबेडकर जयंतीवेळी विविध संगीत पार्टी आंबेडकरी विचार सामान्यांपर्यंत पोचवात. शाहीर विठ्ठल उमप, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांच्यासह 28 कलावंताचा परिचय भीमराव गवळी यांनी या पुस्तकात करून दिला आहे.
या कलाकारांचं वैविध्य, त्यांची निष्ठा व एखाद्या व्रताप्रमाणे समाजाची कलेच्या माध्यमातून करत असलेली सेवा गवळी यांनी समर्पक शब्दात मांडली आहे. आंबेडकरी विचारधारेत या संगीत पार्ट्या व त्याची गाणी याचं स्थान मोठं आहे. पण आतापर्यंत या कलाकारांबद्दल अशी एकत्रित माहिती उपलब्ध नव्हती. ती या पुस्तकामुळं उपलब्ध झाली आहे.