नवनवीन पदार्थ करण्याची हौस अनेक महिलांना असते. कमी वेळात, कमी खर्चात रुचकर पदार्थ तयार करणे हे कोणाला नको असते? अशा पदार्थांच्या कृती प्रभा पुरुषोत्तम प्रभुणे यांनी 'झटपट बनवा' मधून दिल्या आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधून हे पदार्थ तयार होणारे आहेत. उपवासाच्या विभागात फ्रूट पंच, तुळशीच्या बियांचे सरबत, विविध फळांचे रस, कुल्फी, आइस्क्रीम अशा गारेगार पदार्थांसह लोणची, चटण्या, सार, कोशिंबीर, उपवासाच्या भाज्या, पोळ्या, भाकऱ्या, पुऱ्या, थालीपीठ, वडे व भजी, डोसा, इडली, पॅटिस, कटलेट, चिवडा, शेव, गोडाचे पदार्थ आदींचा समावेश आहे. इतर पदार्थांमध्ये ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या, कुरडईचा चिवडा, औषधी लोणचे, शेंगोळे, भरली भाकरी, आंबोळी, काकडीचे पातोळे, मूग-मटार सामोसे, चवळीचे मुठीये, कोबीच्या वड्या, तिखी भाकरी, खाकऱ्याचा भुगा, रोटला, राजस्थानी गट्टे, झुणझुण्या, तिकडीमाँ, पंचमेळ डाळ, तांदळाच्या पिठाची कडबोळी, उपरपेंडी, पेंडवटण, हुरड्याची उसळ, फणसाचे काप, राधा बल्लवी अशा वैविध्यपूर्ण पदार्थाच्या पाककृती यात दिल्या आहेत.
‘झटपट बनवा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5425581874572797553