Summary of the Book
गाव तेथे एस.टी. हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या एस.टी. महामंडळात काही तत्त्वांचा अवलंब करून काम केलेल्या मोहन विश्वनाथ कारेकर यांचे हे अनुभवकथन राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) अवाढव्य पसाऱ्याची ओळख करून देते. ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणून काम सुरू केलेले कारेकर उच्च पदावरून निवृत्त झाले. 34 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एस. टी. महामंडळात विविध स्थित्यंतरे बघितली. एस.टी.चे काम किती अवघड आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाशी किती जोडलेले आहे, याचे प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना अनेक प्रसंगांतून येते. अनेक नेते, अधिकारी यांच्याबरोबर काम केलेल्या कारेकर यांचा अभ्यास आणि महामंडळाबद्दलचे प्रेम पुस्तकातील विविध उदाहरणांतून जाणवते.