Summary of the Book
वास्तूरचनाशास्त्राचे अध्वर्यू लॉरी बेकर यांचं अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेलं हे चरित्र. भारतात राहून त्यांनी पाश्चात्यांना भारताकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली. ब्रिटनमध्ये वास्तूविशारद पदवी घेतल्यानंतर भारतातील पिठोरागडसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात १५ वर्षे वास्तव्य केलं. वास्तुकलेसंबंधी त्यांनी सर्वसामान्यांना समजेल असं विपुल लेखन केलं. त्यांची चित्रही तेवढीच अर्थवाही आहेत. अल्पखर्ची घराचा तज्ञ असं त्यांना संबोधलं जात असे. सौर ऊर्जेवरील दिवे, बायोगॅस, झाडे असणारे शहर हे त्यांचं शहराचं चित्रं होतं. बांधकाम खर्चात कपात करण्याचे मार्ग त्यांनी दाखविले. इंदिरा आवास योजनेसाठीही मार्गदर्शन केलं. नैसर्गिक आपत्तीनंतर पुनर्वसनाच्या कामी त्यांनी नेहमीच मोलाची मदत केली. देश-विदेशातील अनेक सन्मान लाभलेले बेकर यांचं हे चरित्र रसाळ आहे.