कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करीत कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे साध्य होते ते शेअर बाजारामुळे. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार कुणीही अगदी घरातून, घराबाहेरून, ऑफिसमधून, प्रवासातून, मोबाईलच्या साह्याने हे व्यवहार करता येतात, असे स्पष्ट करीत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी 'शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा' मधून विस्तृतपणे मार्गदर्शन केले. शेअर बाजार म्हणजे नक्की काय याची प्रथम ओळख करून देत गुंतवणुकीचे महत्त्व, ती का करावी, शेअर मार्केट गुंतवणूक किती करावी, त्याचे फायदे, शेअर, डिव्हीडंड, बोनस शेअर, गुंतवणुकीचे प्रकार, भारतीय शेअर बाजार याची माहिती दिली आहे. शेअर व्यवहारासाठी आवश्यक डिमॅट अकाऊंट, शेअरबाजार, सेन्सेक्स आणि निफ्टी, डेरिव्हेटिव्हज मार्केट ( वायदे बाजार ) म्हणजे काय, झटपट पैसे कमावून देणारे शेअर कसे ओळखावे, शेअरचे तांत्रिक विश्लेषण अशी सर्व माहिती यात सोप्या भाषेत दिली आहे.
‘शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5163995755262308716