Summary of the Book
मुलांच्या जगात कुटुंबाबरोबरच मित्र - मैत्रिणी, आसपासचे जग, पशू - पक्षी अशा साऱ्यांचाच समावेश होतो. या जगातील विविध छटांना डॉ. कल्याण इनामदार यांनी पुस्तकबद्ध केले आहे. गोष्टींच्या या मालिकेत जंगलकथा, रम्यकथा, बोधकथा आदी वैविध्यपूर्ण कथा वाचायला मिळतात.
लाकूडतोड्याला झाडने शिकवलेले शहाणपण, राजाला सुखाचा महामंत्र देणारा शिवा नावाचा सामान्य माणूस, खोटारडी चतुराई कशी अंगलट येते हे कोल्ह्याला शिकवणारा वाघोबा, संधीचा फायदा घेणारा उंट, धाडस दाखविणारा सुतारपक्षी, फाजील अट्टहास करणारा धनपत, महादुला मदतीचा हात देणारे माकड, मोठेपणाचा हट्ट सोडणारा सिंह असे अनेक जण या कथांमधून भेटतात आणि काही ना काही शिकायला मिळते.