Summary of the Book
पैसा हा प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहे.पैसा ही माया आहे असे विधान छातीठोकपणे आपण अनेकदा करतो. परंतु याच पैशाभोवती दुनिया फिरते , हे सत्यही विसरून चालत नाही. विनायक कुलकर्णी लिखित गोष्टी पैशाच्या या छोटेखानी पुस्तकात लेखकाने अनेक आर्थिक व्याव्हारांविषयी उपयुक्त माहिती दिली आहे. नाण्याचा जन्म कसा झाला , नोटांचा जन्म , बँकांचा उदय, शेअर्स, क्रेडीट कार्ड, विमा दारिद्र्यरेषा , अर्थसंकल्प अशा आर्थिक गोष्टींची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.