Summary of the Book
दिलीपकुमार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता. शोकात्म कथांचा नायक अशी त्याची प्रतिमा हिंदी चित्ररसिकांच्या मनात ठसलेली आहे. राम और श्याम, क्रांती, गोपी, सौदागर असे काही वेगळ्या भूमिकांचे चित्रपट दिलीपकुमारने केलेले असले तरी त्याची प्रतिमा शोकात्म नायकाचीच राहिली आहे. "दिलीपकुमार भारतीय चित्रपटसृष्टीतला स्टार लीजंड' या बनी रुबेन लिखित चरित्रग्रंथाचा मराठी अनुवाद नुकताच प्रकशित झाला आहे. श्याम फरांदे यांनी हा अनुवाद केला आहे.
दिलीपकुमारला 1950 च्या दशकापासून ओळखणाऱ्या व त्याच्या अभिनय कारकीर्दीचा साक्षीदार असलेल्या बनी रुबेन यांनी हे चरित्र लिहिल्यामुतळे त्याला अधिकृतपणा आला आहे. दिलीपकुमारच्या प्रगतीचा आलेख, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेले विचार व मनोगते याचा साक्षीदार या नात्याने त्यांनी सहृदयतेने हे चरित्र लिहिले आहे. मात्र हा दिलीपकुमारचा गौरवग्रंथ नव्हे. त्याच्या गुणांचे वर्णन नव्हे, तर त्याच्या जीवनातले वास्तव परखडपणे व स्पष्टपणे मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.