Summary of the Book
'फेसबुक' आता शालेय विद्यार्थी, तरुणांपासून ते ज्येष्ठांचे हातातील खेळणे झाले आहे. पण याचा वापर बरेचदा लाईक, डिसलाईकच्या च्या पुढे फारसं जात नाही. अनेकांचा फेसबुक टाईमपास असतो. पण याचा पुरेपूर वापर करीत नवीन विचार, नवीन विषय मांडून अभिव्यक्त होण्यात सचिन मधुकर परांजपे यशस्वी ठरले आहेत. त्यांनी फेसबुक वरील पोस्टवर जे लिखाण केले आहे. त्यांचा दिलखुलासपणा, मोकळेपणा, संवेदनशीलता जाणवते. वडिलांचे चित्रणही त्यांनी आडपडदा न ठेवता केले आहे.
गावातील श्रीधराप्पा, बिनधास्त चित्रा शर्मा, कॅबिनेट मंत्र्यांचा पीए अशा अनेकांचे व्यक्तित्व यातून शब्दबद्ध केले आहे. तसेच स्वतःबाबत त्यांनी अनेकदा लिहिले आहे. आयुष्यात आलेले प्रसंग, अनुभव, निसर्गचित्र, एखाद्या विषयावरील विचार त्यांनी फेसबुक वरून व्यक्त केले आहेत. त्याचे एकत्रित लिखाण माझी फेसबुकगिरी या पुस्तकात वाचायला मिळते. अगदी साध्या, नेहमीच्या वाटणाऱ्या विषयावरील वेगळे लिखाण वाचायचा आनंद यातून मिळतो..