Hard Copy Price:
R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपल्या तनामनाला लगडलेल्या नव्या पोपटी पानाचा अर्थ शोधते आहे. तिच्या धुक्यात न्हाणाऱ्या या धूसर जगात आताशा ग्लोबलायझेशन नंतरचे व्हर्च्युअल विश्वही मिसळू लागले आहे. तिचे आभास आणखी गडद होऊ लागले आहेत. सोळाव्या मैलाच्या दगडाला छान वळसा घालत असताना वळणाचा बाक आणि आजूबाजूला पसरलेल्या दऱ्याखोऱ्यांच्या धाकाने ती अवाक झाली आहे. या वळणावरच्या ओल्या मातीत उमटलेली तिची रेखीव पावलं ती स्वतःच निरखत रहाते.
आपल्या कॅमेऱ्यात कैद करते. साऱ्या इमेजेस...आणि इन्फेक्शिअस उत्साहाने, हेवा वाटावा इतक्या अंगभूत प्रामाणिकपणे साऱ्या साऱ्या इमेजेस तुमच्या माझ्याशी शहरे करते. या हाय डेफिनेशन इमेजेस प्रथमच या वळणाचा, स्वतःभोवतीच गिरक्या घेणाऱ्या घाटाचा हाय रिझोल्यूशन आंखो देखा हाल आपल्यासमोर उभा राहतो. तुझं - माझं नातं, प्रेम, वयात येणं, खऱ्या- खोट्याच्या रंगात बेमालूम रंगलेलं आजुबाजूचं जग या साऱ्यांवर नवागत प्रकाश टाकणारी, अवघ्या सोळा वर्षाच्या मुलीने लिहिलेली मराठीतील पहिलीवहिली कोवळी कादंबरी...! ...पुन्हा नव्या 'लॉग - इन'चे आमंत्रण देणारी...!
खरच कधी विचार नव्हता केला की एक सोळा वर्षाची मुलगी पण कादंबरी लिहू शकते आणि तेही इतकी छान.ही फार कौतुकास्पद बाब आहे, श्रुती ने ज्या प्रकारे ही कादंबरी लिहिली आहे त्यामध्ये अगदी जस असायला हवं तसंच लिहलय. खरच ही कादंबरी logout करायला भाग पाडणारी नक्की आहे...वाचकांनी एकदा तरी नक्की वाचली पाहिजे.