Summary of the Book
मराठी लेखन विषयीचे १४ नियमांना १९६२ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली. त्यात नंतर आणखी चार नियमांची भर पडली. शुद्धलेखनाचे हे नियम विद्यार्थ्यांना सोपे करून सांगण्यासाठी मो. रा. वाळिंबे यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' हे पुस्तक लिहिले आहे. शुद्धलेखन म्हणजे काय, अनुस्वार, र्हस्व, दिर्घांचे बारकावे, इ - कारान्त व उ - कारान्त, जोडाक्षरे, सामान्य रूप, व्यंजनान्त शब्द, बोलण्याची व लिहिण्याची भाषा, विरामचिन्हे, निर्दोष वाक्यरचना, मुद्रितशोधन व शुद्धलेखन, मराठी शुद्ध शब्द - सूची याची सविस्तर माहिती यात दिली आहे.
शुद्धलेखनाबरोबरच विद्यार्थ्यांना परीक्षेत निबंधाचा मोठा बागुलबुवा वाटतो. पण खरे तर आपली भावना, कल्पना, सृजनशीलता, भाषेचे सौंदर्य निबंधातून उमटत असते. निरीक्षण, विविध विषयांची माहिती घेणे, नोंदी करणे, माहिती संग्रह करणे, अशी पूर्व तयारी केली तर विद्यार्थी स्वतःचा उत्तम निबंध लिहू शकतात, असा विश्वास सुलभा प्रभुणे यांनी 'निबंध रचना तंत्र आणि मंत्र' मध्ये दिला आहे. त्या विषयीचे मार्गदर्शन करून काही विषयांवरील निबंध यात आहेत.