Summary of the Book
लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेचे वृत्तांकन करताना आलेल्या अनुभवांचे कथन प्राध्यापक संजय दुधाणे यांनी केले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळांडूनी केलेले विक्रम, तसेच भारतीय खेळाडूंचा पराभव हे सारे त्यांनी पाहिले, त्याला शब्दरूप दिले आहे. केवळ लंडन ऑलिंपिक स्पर्धेची माहिती न देता आधीच्या स्पर्धांचाही संदर्भ देत त्याबद्दलचे काही लेख त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. त्याचबरोबर लंडनमधील मराठी आणि गुजराती माणसांबद्दल, तसेच लंडन शहराबद्दलची निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. काही खेळाडूंचाही परिचय, भारताच्या कामगिरीची माहिती देणारा तक्ता आणि लंडनमधील काही महत्त्वाच्या ठिकाणाबद्दल माहिती देणारे हे पुस्तक वाचनीय झाले आहे.