Summary of the Book
व्यक्ती आणि समाज या दोन मानवी व्यवहारांच्या नाण्याच्या दोन बाजू. दोन्हीचं नातं अद्वैताचं. दोन्हीला परस्परांहून वेगळं तर करता येत नाहीच, उलट ते परस्परपूरक आहे. समाजशास्त्राचं हेच मूलभूत तत्त्व, आणि हाच प्रामुख्याने पाचव्या खंडातील लेखांचा विषय. या खंडात सामाजिक एकात्मता, सामाजीकरण, सामाजिक जीवन हे विषय आहेत, तसेच स्त्रीविषयक लेखांचाही समावेश आहे, आणि ज्ञानाचे समाजशास्त्रासारख्या नवीन विषयालाही स्र्प केला आहे. हा खंड प्रकाशित झाला, तेव्हा समाजशास्त्र हा विषय विकसित होण्याच्या मार्गावर होता. आज हा विषय खूपच अभ्यासनीय, विस्तृत संकल्पनांवर आधारित आणि नवनवीन कल्पनांचा आविष्कार व अभिनव दृष्टी यांनी परिपूर्ण बनला आहे. त्यामुळे या बदलत्या जगाचा जास्तीत जास्त आढावा नवीन पुरवणी खंडात घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुरवणी खंडात नवीन विषय, संकल्पना, विचारवंत, बदलती परिस्थिती यानुसार लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. या खंडात अखेरीला लेखसूचीही देण्यात आली आहे. पाचव्या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- साम्यवादी चळवळ, सामाजिक आंदोलन, सामाजिक एकात्मता, सामाजिक गतिशीलता, सामाजिक जीवन, सामाजिक नियंत्रण, सामाजिक परिवर्तन, सामाजिक मानदंड, सामाजिक समस्या, सामुदायिक शेती, सार्वमत, सांघिक सौदा, स्टालीन, स्वातंत्र्य, सिस्मंडी, स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रीशिक्षण, सुवर्णप्रमाण, स्पेन्सर हर्बर्ट, सोव्हिएट, हस्तव्यवसाय, हाराकिरी, हॉब्ज थॉमस, हिंदू राष्ट्रवाद, हुंडा, हुकूमाही, ह्यूम अॅलन, हेगेल विल्यम, हेरगिरी, होमरूल चळवळ, ज्ञानाचे समाजशास्त्र इत्यादी.