Summary of the Book
मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्या आणि कथा या भारतीय साहित्यात अभिजात साहित्यप्रकारात गणल्या जातात. अभिजात असले तरी प्रेमचंदांचे साहित्य तितकेच लोकप्रियही आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद वेगवेगळ्या भाषांमध्ये अधूनमधून होतच असतात, किंबहुना परत परत होत असतात.
प्रस्तुत संकलनही अशांपैकीच आहे. यातल्या काही कथांचे अनुवाद यापूर्वीही मराठीमध्ये झालेले आहेत, पण या संग्रहातील दहाच्या दहा कथा याआधी पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या नव्हत्या, हेच या पुस्तकाचे वैशिष्टय़. 'ईदगाह', 'बुढी काकी', 'कफ़न', 'जीवन का शाप', 'शांति' अशा गाजलेल्या कथा या संग्रहात आहेत. या कथा दमदार आणि जीवनाचे अनेकांगी दर्शन घडवणाऱ्या आहेत.
प्रेमचंदांची भाषा, कथा सांगायची त्यांची पद्धत आणि निवदेनशैली जशीच्या तशी अनुवादात आणणे तसे कठीणच. अनुवादिकेनी प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना फारसे यश आलेले दिसत नाही, पण मूळ कथा पकड घेणाऱ्या आहेत. अनुवादात त्यांची काहीशी हानी झाली असली तरी त्या वाचल्याच पाहिजेत अशा आहेत.